Ontra Labs
04 / 05दूध ताप प्रकरणाच्या फाइल्स

All year · 3 September 2026 · 4 min read · Ontra Labs Animal Health

दूध ताप प्रकरण - ४

गाय: मिल्क फीवरची क्लिनिकल लक्षणे असलेली

मुख्य संकेत: मिल्क फीवर असलेल्या गायीमध्ये जेर अडकण्याची समस्या (RFM), कीटोसिस आणि मॅस्टायटिसची प्रकरणेही आढळली

आजची गुत्थी: “कॅल्शियमच्या कमतरतेमुळे इतर अनेक आजार का झाले?”

या केस मधून शिका: स्नायू, नर्व्हस सिस्टीम, रुमेन, कास आणि गर्भाशयामध्ये कॅल्शियमची भूमिका.

कॅल्शियम काय करते?

“कॅल्शियम फक्त हाडांसाठीच असते का?”

शेतकऱ्याने विचारले -

“कॅल्शियम तर हाडे मजबूत करण्यासाठी आणि दूध उत्पादनासाठी असते ना?”

अगदी बरोबर. पण गायीच्या शरीरातील कॅल्शियमची भूमिका यापेक्षा खूप मोठी आहे.

संकेत क्रमांक १ - स्नायू

स्नायूंच्या आकुंचनासाठी कॅल्शियम आवश्यक असते.

त्यामुळे मिल्क फीवरमध्ये:

स्नायूंची ताकद कमी होते

आणि गाय:

  • डगमगू शकते
  • थरथरू शकते
  • उठताना त्रास होऊ शकतो
  • शेवटी बसू शकते

संकेत क्रमांक २ - नसा

कॅल्शियम मज्जासंस्थेच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.

त्यामुळे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मज्जासंस्था आणि स्नायूंमधील संदेशवहनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दूध उतरण्याच्या प्रक्रियेत अडचणी दिसून येऊ शकतात.

संकेत क्रमांक ३ - रुमेन

रुमेनची हालचाल देखील स्नायूंच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. त्यामुळे कॅल्शियमच्या कमतरतेमध्ये रुमेनच्या हालचाली कमी होऊ शकतात. आणि त्याचा परिणाम शेतकऱ्याला असा दिसू शकतो:

अन्नाचे पचन नीट न होणे — रवंथ कमी → दाणा-चारा कमी खाणे → ऊर्जेची कमतरता — कीटोसिसचा आजार

संकेत क्रमांक ५ - गर्भाशय

गर्भाशय देखील स्नायूंनी बनलेला एक अवयव आहे.

गंभीर मिल्क फीवरमध्ये गर्भाशयाचे आकुंचन प्रभावित होऊ शकते आणि असे झाल्यास डिस्टोसिया (प्रसूतीमध्ये अडचण) आणि पुढे जेर अडकण्याची (RFM) प्रकरणे पाहायला मिळू शकतात.

मग खरी गोष्ट काय आहे?

कॅल्शियम केवळ: “हाडांचे मिनरल”

नाही. ते गायीच्या: स्नायू + नसा + रुमेन + कास + गर्भाशय यांच्या सामान्य कार्यासाठी देखील महत्त्वाचे आहे.

Products that help
05दूध ताप प्रकरण - ५

More from Dairy Farmer’s Corner

This is general guidance to help you spot problems early. It is not a diagnosis. If an animal is unwell, call a registered veterinarian before giving any medicine.